हृदयांस तुझ्या रे नको बदलवू आता
बदलून जगाला नको बिघडवू आता
प्रेमाचा साबण लावुन चमक जरा तू
बुडबुडेच नुसते नको पसरवू आता
मी पत्थर आहे, पत्थर म्हणून जगतो
शेंदूर लावुनी नकोस चिडवू आता
भूमीत उतरता सीता म्हणते, 'रामा ! -
नजरेतुन अपुल्या नको उतरवू आता'
उत्तरे जयाची तुलाच कापत गेली
ते प्रश्न जगाचे नको सोडवू आता
मी घेतो कुठली शाळा जरा अताशा
मजसाठी पदवी नको मागवू आता
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा