काळजाला जाळतो हा पावसाळा
अन तुला कुरवाळतो हा पावसाळा
चातकाला जा कुणी सा॑गून टाका
रोज त्याला टाळतो हा पावसाळा
वाट राधा पाहते यमुना किनारी
शब्द कोठे पाळतो हा पावसाळा
च॑द्रमोळी झोपडी ही मोडलेली
अन तिच्यावर भाळतो हा पावसाळा
जलसमाधी झोपड्या॑नाही दिली अन
ब॑गले सा॑भाळतो हा पावसाळा
- रवि केसकर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा