कोरले भाग्यास मी वाळूत आहे
वादळाची हाक अध्यारूत आहे
ना कळू देणे मनाचे या जगाला
या उपायानेच मी शाबूत आहे
जात येतो, येत जातो,थांबतोही
गर्व सोडा श्वास ना काबूत आहे
ती पुढे सर्वात आनंदात चाले
प्रेतयात्रा ही जणू ताबूत आहे
वाटले सोडून द्यावे, फार झाले!
काय ना काव्यात जे दारूत आहे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा