प्रकाश स्वप्ने पहात होतो..
तरिही खितपत रहात होतो..
अनुरागाला समजुन ओझे..
व्यथा उगा मी वहात होतो!!
हातावरची जीवन रेषा..
कोठे सरते पहात होतो..
स्वप्न कोवळे..केविलवाणे..
नियमाने मी पहात होतो..
पुन्हा तुझे हे जवळुन जाणे..
लांब जरी चार हात होतो!
-- बहर.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा