झरा वाहिला आशेचा अन् माझा सारा मूड बदलला
गाडीमधून जातांना मी किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची नावे कळण्याआधी मार्ग कधीचा मागे पडला..
दोन दिशांना करून वाटा, आला रस्ता समोर जेव्हा
मार्ग कोणता घ्यावा आता मी वळणांच्या वाटामधला
मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे कोणते वादळ झाले की ओळख तो जुनी विसरला?
प्रवास म्हणता ,समोर आला, मनात माझ्या असा दुरावा
लोकामधला, सत्तेमधला, जगण्यामधला तत्त्वामधला
असे कशाला..तसे का बरे.. लाटा आल्या ,उधाण आले
अन् उत्सुकता सरली तेव्हा वादळ शमले ,रोष निवळला
पानाफुलात किती शोधले, किती कळ्यांना मी विचारले
ज्याचे आहे तुला वेड तो प्रियतम काही नाही दिसला
-सोनाली जोशी
ही रचना इथेच प्रकाशित केली होती , लयीत थोडा बदल करून पुन्हा प्रकाशित केली आहे. आता थोडी बरी झाली असेल असे वाटते आहे..
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा