तन मन वचने आवर सखये
ती राधेची घागर सखये
तुझे उमलणे माझे असता
जळू कशाला तुजवर सखये ?
जेथे पूजा तिथेच असतो
कळ्याफुलांचा वावर सखये
कुणी गुरू ना कुणी लघू ही
तयातून घे सुन्दर सखये
संस्कृतीतले प्राकृत शोधू
जरी जाहलो नागर सखये
तापव लोणी घृत मिळवाया
तपावीन ना अम्बर सखये
प्रथा रुढींची पिके घ्यावया
का हृदयावर नांगर सखये ?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा