राख..!

मी अभिजीत - ⏱ १ मिनिट


अता रात्र नाही गंधाळलेली..
उरी चंद्रकोरी कवटाळलेली..


तरीही बहर निशिगंधास येतो
नजर मात्र त्याची ओशाळलेली..


सखे शब्द होते कविता सहेली
अता फक्त पाने चुरगाळलेली..


पुन्हा एकटा मी उरतो किनारी
पुन्हा लाट येते फ़ेसाळलेली..


जरा थांब मरणा सोबत तुझ्या घे
मला जिंदगीही कंटाळलेली..


किती जाळण्याची केलीत घाई
तरी राख मागे रेंगाळलेली..!


–--   अभिजीत दाते

गझल