न्हाऊनि येता अशी,ती केस झटके रेशमी.
बदलती वारे अचानक "मतलबी" बेमौसमी..
गोड होती फार म्हणुनि काल कौटाळिलि जीला.
फेकली रद्दीमध्ये मी कालची ती बातमी..
चालुनी गेलो कुठे मी..लागला चकवा असा.
पावलांचा हाय माझ्या..काढतो रे माग मी..
वेदनांची रांग मोठी पाहिली मी अंगणी
पाळणारा कोण ऐसा भेटतो का नेहमी?
मी चितेवरि पेटताना,दु:ख रडले फार माझे.
हासले देताच त्याला पुनः भेटण्याची हमी..
------- योगेश जोशी.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा