ऋतू कोणता

दिलीप पांढरपट्टे - ⏱ १ मिनिट

 

 न उष्मा, न थंडी,न बरसात आहे
ॠतू कोणता आसमंतात आहे?


तुझ्यावीण सोसू कशी पोर्णिमा ही?
फिका चन्द्र आहे,सुनी  रात आहे


किती सुन्न साऱ्याच संवेदना या
जणू जिंदगी  दीर्घ कोमात आहे


अता थांबवू ,जीवना ,ही  लढाई
तुझी हर घडीला नवी मात आहे


विखुरले जरी लाख तुकडे मनाचे,
तुझा भास प्रत्येक तुकड्यात आहे












 

 

 


























































 

 

 

 

 

गझल