सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई

सुनेत्रा सुभाष - ⏱ १ मिनिट


सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई
ओठ देतील मला भेट दवाची बाई

दोन घेण्यास कडू घोट कुणी ना येते
लाव  बोटे तव  काव्यास मधाची बाई

पाश तोडून  जुने घट्ट कशाला आलो?
ओढ  होतीचगं  ओढाळ जलाची बाई

बोलता मी   तव   नाका  मिरची का झोंबे
का  धरावी गुळणी मीच मिठाची बाई

सर्व  वाटून फुले हात तुला मी  देता
देव देईल खरी नीज  सुखाची  बाई

का  'सुनेत्रा' म्हणती  ते  रजनी  अंधारी?
शुभ्र गर्भात तिच्या प्रीत शिवाची बाई



गझल