मोह, पापे, लोभ, हेवा, शांततेने चालुदे
ईश्वरा इंद्रीय-सेवा शांततेने चालुदे
ठेवतो पेढे, फुटाणे, वाकतो दगडापुढे
मीच म्हणतो खात मेवा, शांततेने चालुदे
जन्म जाळ्यातील माशासारखा केलास तू
शांततेने संपुदे वा शांततेने चालुदे
पाहिजे तर लाद पुरुषावर अता गर्भारपण
स्त्री नको धाडूस देवा.... शांततेने चालुदे
जीवनाचा अर्थ माझे श्राद्ध केल्यावर कळे
कावळ्यांनो मस्त जेवा, शांततेने चालुदे
'बेफिकिर' आला कुणी, घाईत गंगा पाजली
यार येथे मद्य ठेवा, शांततेने चालुदे
सूट - तिसर्या शेरात काफिया दोन शब्दांत विभागला आहे. अशी उदाहरणे आहेत.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा