ओठातुन माझ्या शब्द सांडतो आहे..
अन् अर्थ तयाचा माग काढतो आहे
हृदयावर विणुनी जाळे शब्दार्थांचे..
तक्रार नसावी - ' श्वास कोंडतो आहे '
बोजड शब्दां आकार लाभण्या काही..
बुद्धीची ऐरण रोज ठोकतो आहे
सोप्या शब्दांना समजुन घेण्या मीही
फेरीवाल्यांना रोज भेटतो आहे
सार्या शब्दांना खंत एवढी वाटे..
की, मी नसलेले अर्थ बोलतो आहे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा