शेवटाला चार नाही(त) !!!
.
गाव वेडे ठार नाही !
सांगणे ही फ़ार नाही !
वेस तेथे दूर आता,
मानली मी हार नाही !
खालमानी लाळघोटे,
बोलण्या त्या धार नाही !
पाठ दावी ऐनवेळी,
एक सच्चा यार नाही !
ग्रंथ-पोथी पाठ-पूजा,
जीवनाचे सार नाही !
जाण येथे जाणत्याला,
चाबकाचा मार नाही !
शीड घेई हेलकावे,
नाव होणे पार नाही !
काय येथे जोडले मी ?
शेवटाला चार नाही(त) !!!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा