सखे

बापू दासरी - ⏱ १ मिनिट

नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता


तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता


जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता


इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता


असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता : बापू दासरी

गझल