संपत नाही

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट


वाद घालणे संपत नाही
श्रेय लाटणे संपत नाही

ओळ वाचुनी संपली जरी
अर्थ लावणे संपत नाही

खूप भांडणे झाली पण हे
ओढ वाटणे संपत नाही

दूरचे दिवे मोहविणारे
दूर पाहणे संपत नाही

रान पेटले भोवती जरी
शांत राहणे संपत नाही

गझल