(स्थळावर प्रकाशित केलेल्या या गझलेत नवा शेर नुकताच लिहिला (जांभळ्या रंगातील ))
नको सत्ता, नको दौलत
हवी केवळ तुझी सोबत
पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...
नको तो मोह स्पर्शाचा
पुढे जाऊ चुका टाळत
कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली 'गंमत'
कधी होणार तू माझी ?
-- कळू दे ना तुझेही मत !
'लिही माझ्यावरी कविता'
-पुन्हा आली व्यथा सांगत
- केदार पाटणकर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा