तिला मी भेटतो आहे पुन्हा... रोखा मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...
दिगंताहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..
दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मोका मला..
नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..
किनारा तू नकोरे दाखवू मज सागरा..
किनारी न्यायची नाही कधी नौका मला..
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा