सूर माझे उदास आताही
तू रहा आसपास आताही
दूर गेलीत पाखरे सारी
झाड शोधे कुणास आताही?
फूल सांगे विषण्ण वार्याला
"गोठला रे सुवास आताही"
शोध माझाच मी किती केला?
चालला तो तपास आताही
भूल पडली तुझी युगामागे
भूल आहे जिवास आताही
-- दिलीप पांढरपट्टे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा