सवे या चांदण्यांच्या मी कशाला जागलो होतो ?
फुलांशी मी कुणासाठी, कशाला बोललो होतो ?
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
पुढे वेगात जाणे हे मलाही शक्य होते पण..
..तुझ्यासाठीच मागे मी जरासा थांबलो होतो
तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'
-केदार पाटणकर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा