वेगवेगळ्या धर्मांचे वेगळे रंग झाले
सारख्याच माणसांचे आगळे ढंग झाले
आज राहिला न गाभा-यात माझा विठोबा
मोजण्यात नोट सारे मंदिरी दंग झाले
काय बोलणार ताटाखालची मांजरे ही?
बोललो जरा कुठे मी आणि वादंग झाले!
भाकरी न भेटली त्यांना कुणा काय वाटे?
ती रिती जरी तिजोरी, 'हे' खिसे तंग झाले
शोधतो अजूनही मी भूतकाळास माझ्या
काय मी करू सखे? स्वप्नही असे भंग झाले...
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा