तगमग

ॐकार - ⏱ १ मिनिट

जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग


होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग


फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग


इथे किती गजर्‍याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?


सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग


गझल