पुरे जाहले चांदणे पाहणे..
असे रोज एकेकटे जागणे
उले फूल पानातुनी गोजिरे..
तसे ओठ उमलुन तुझे हासणे
जसा सूर्य संध्येस रेंगाळतो..
मनाचे मनाशी तुझे बोलणे
कशाला हवी व्यर्थ मद्यालये ?
तुला पाहणे अन् नशा साधणे
पुरे जाणतो मी, मला पाहुनी..
तुझे आतल्या आत ओशाळणे
नभी तारकांना चमकण्या अता..
मिळे ताल बघुनी तुझे चालणे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा