त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
का हव्याशा वाटणार्या आठवांना टाळले मी
फक्त आहे तीच सोबत हेच होते मानले मी
....................................................
'फोन नंबर दे म्हणाला,' तो मलाही शेवटी मग-
भेटण्याचे , लाजण्याचे खूप इमले बांधले मी
त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
अन् फुलाला जागण्याचे भान आले ..शोधले मी
............................................
का धरावी सोबतीची आस त्याने आज माझ्या?
जीवघेणे पावसाळे एकटीने काढले मी
बोलतो तो एक करतो वेगळे काही.. तरीही
(नाटकी त्या बोलण्यावर केवढे हे भाळले मी)
आणले पैसे कसे ही चौकशी तू का करावी ?
खर्च केला कोणता तू ?काय केले ?काढले मी?
गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी ..
बांधलेली गाय बकरी का कुणाला वाटले मी ?
- सोनाली जोशी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा