आनंद पार त्यावरी , ती का बसावी वेदना
येऊन त्या सुखासवे, ही का हसावी वेदना.
का वाटते मला असे, त्यांना फसावी वेदना.
योगीच हा मनातला, की भाव ऐसे सांगतो
वैर्यासही अशी कधी , ही ना डसावी वेदना.
माझाच हात मारतो, त्याची नसावी वेदना.
नाहीतरी तुझ्यासवे, माझे नशीबा फाटले
जातोस जा दुज्याघरी , माझी असावी वेदना.
प्रज्ञा महाजन
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा