वराकडील मानपान

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

निकाल लागला कधीच या जगायचा
उगाच प्रश्न ऐच्छिकातला लिहायचा

पुन्हा नवी पहाट दाखवे नवा जिना
पुन्हा सवाल हाच की कसा चढायचा

न फायदा तरी न मोह सोडला कधी
जसे म्हणायचीस तू तसे करायचा

तुझाच भोंडला तुझाच आव सारखा
खिरापतीस आमच्या न ओळखायचा

 वराकडील मानपान मीच पाहतो
असाच भेटलाय तो मला पहायचा

सतर्क जीवनास पाहिजे करायला
नसायचो, उगाच पाळणा हलायचा

 


 

 

 

 

 

 


 

 

 

गझल