त्या जागेवर ती दिसण्याला वर्षे झाली
तिने फक्त माझे असण्याला वर्षे झाली
गर्दीतुनही तिथे अचानक तिने स्वतःहुन
नांवगांव माझे पुसण्याला वर्षे झाली
कुठे तुझे गं मावळले ते रुसणे फुगणे
अशा तुझ्याही मग नसण्याला वर्षे झाली
ओळख देऊन पुन्हा चौकशी हसता हसता
ठरलेल्या माझ्याही फसण्याला वर्षे झाली
नवा शब्द होता माणुसकी,अर्थही त्याला
नव्हे,मनावर हे ठसण्याला वर्षे झाली
झाडाखाली बसण्याऱ्याला मिळे सावली?
विश्वास कुणावर बसण्याला वर्षे झाली
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा