ययाती

मनोज सोनोने - ⏱ १ मिनिट

बांधूनही मनोरे ,किर्ती  कथेत नाही.....
इतिहास सांगतो हा ,स्वप्नात नेत नाही.....


छातीत वेदनांचे, भरपूर पीक येते
डोळ्यात आसवांचा ,पाऊस येत नाही


तारुण्य मागणारा ,शापीत मी ययाती
माझीच देवयानी ,माझ्या कवेत नाही


नशिबा विचार कसला, करतोस नेहमी तू
झोळीत दान माझ्या ,काहीच येत नाही


उपवास देवतांचे, मी काल खूप केले
कुठ्लाच देव येथे, ऐकून घेत नाही


प्ल्यास्टीक सर्जरीने ,माणूस हा बदलतो
बदलून या मनाला ,कोणीच देत नाही


                        -मनोज सोनोने
                      आदर्श कॉलनी, अकोला.
                      मो. नं. ९९२१५४३२३१

गझल