सुरेशचा जन्म १५ एप्रिल १९३२ चा. (स्थळ: अमरावती, तिथी रामनवमी, वेळ दुपारी १२ ची). सुरेश अडीच वर्षांचा असताना त्याला पोलिओ झाला. त्यामुळे माझी आई व डॉक्टर असलेले वडील हादरले, पण त्यावर शास्त्रोक्त उपचार व्हावेत म्हणून मुंबईच्या कात्रक यांच्याकडे त्याला नियमितपणे घेऊन जात असत. त्याचा फायदा पुढे सुरेशला झाला. त्याच्या अधू पायात इतकी शक्ती आली की, त्याला तेव्हा चालण्यासाठी