असे कसे ते मधेच घडते?

चमत्कारी - ⏱ १ मिनिट

असे कसे ते मधेच घडते? दोष असावा काही बाही
आत्ता वाटे 'शायर आहे' आत्ता वाटे नाही नाही


करा पसारे, असे करा पण, देवा स्वतःसही समजावे
मानव म्हणतो अर्थ असा अन तुम्ही म्हणावे "नाही काही?"


'लिहीत नाही नशीब जोवर देव आमचे' सुखात आम्ही
सुचले त्याला लिहायचे की सुरू आमचे " त्राहि त्राही"


अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत चालले जीवन आता
निमिषार्धाच्या ठिणगीनेही होते ज्यांची लाही लाही


असे जगा मित्रांनो येथे जीवन उधळो जीव तुम्हावर
मृत्यू तुमचा दिसता त्याला पुढे होत सरसावुन बाही

गझल