शापीत

योगेश जोशी - ⏱ १ मिनिट

 तो घाव हृदयातला,नाही दुखावणारा
थोडाच त्रासणारा,भलता लुभावणारा.


काही न सांगता तू ,मज समजली कहाणी
होता तुझा उसासा,सारेच सांगणारा.


त्याचा नको करु तु,छाती पिटुन धावा
शापीत देव इथला,कोणा न पावणारा.



शोकात फार इतका,परिवार तो बुडाला
 त्यांच्या घरात मेला,कोणी कमावणारा.



होण्यास राख मी ही,भलता अतुर होता
जळले स्मशान,उरलो, मी फक्त पाहणारा.


हे चंद्र सूर्य तारे त्यांच्यात एक मीही
सारेच धावणारे,कोणी न थांबणारा.


----- योगेश जोशी

गझल