उपाय पाहिजे

गौतमी - ⏱ १ मिनिट

का विचारशी उगाच काय पाहिजे?
जीवना मला तुझा उपाय पाहिजे

रोज मी नटेन, रोज पाहुनी मला
यायला तुझ्या मुखात हाय पाहिजे

कोण कोण माणसे दुरावली कुठे?
एकदा वळून ते बघाय पाहिजे

तापवी मनात दु:ख एक एक मी
या मनास यायलाच साय पाहिजे

संकटे तुझ्यामुळेच गौतमी मला
हे कळे, तरी तुझीच राय पाहिजे

 

 

 

गझल