जखम झाली, खूण झाली, रक्त आले? चल पुढे
समज नशिबी यायचे ते फक्त आले, चल पुढे
तिरुपतीच्या दर्शनावेळी तुला ढकले कुणी
मान की धनवान ज्यादा भक्त आले, चल पुढे
तू गझल करतोस अन जाहीरही करतोस ती?
वाटले होते तसे आसक्त आले, चल पुढे
पडु नको फंदात, त्यांची चुंबने बहकावती
सार बाजू गाल जे आरक्त आले, चल पुढे
हासणे हे काम आहे, हास तू, हसता रहा
लोचनी अश्रू जरी कंबक्त आले, चल पुढे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा