कळू लागले
निसटलेले दिवस आता छळू लागले
जीवन माझे मला आता कळू लागले
थकून गेल्या बघा जुनाट वाटा
पाय पुन्हा घराकडे वळू लागले
खरेपणाने वागलो, डाग ना लागला कधी
शुभ्र कपड्यातील ... मनही मळू लागले
पावसाळा कोरडा गेला, शेती ओसाडली
भर उन्हाळ्यात आता आभाळ गळू लागले
उमगले मला जेव्हा, मह्त्व आयुष्याचे
वय दिवसाच्यामागे असे पळू लागले
कित्येक मेल आता बालपण राहिले दूर
खुणावत तारुण्याला वार्धक्य चळू लागले
निवड्णूक अशी लढलो, शत्रू भेदला आरपार
जिन्कण्याच्यावेळी नेमके यार पळू लागले
दशरथ यादव
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा