पुढारी

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

आता मीही थोडा थोडा घडू लागलो
उगाच अपुले क्षणाक्षणाला हसू लागलो


सवाल कोणी उपेक्षितांचा विचारला तर...
'मीही आहे त्यातलाच' हे म्हणू लागलो


खेळ भावनांचा असतो हे कळल्यावरती..
मनात हसलो, जनात थोडे रडू लागलो


माकड म्हटले, 'कुणी मलाही टोपी देण्या -
थोडा आता खुर्चीवरती बसू लागलो'


नेता होता की होता कोणी अभिनेता
हात पसरता दान आंधळे करू लागलो


जे होते आधार कालचे, खचले म्हणुनी..
समोर येता पाठ फिरवुनी वळू लागलो


जरा तपासू म्हटले यांचे खिसे आतुनी
डगल्यांना या अवघड जागी दुखू लागलो

गझल