मला आजचे तुझे वागणे नवीन नाही
तुझे बहाणे,तुझी कारणे नवीन नाही
भरू लागले कसे काय एवढ्यात डोळे?
मुक्या वेदना अशा पोचणे नवीन नाही
लिहिलेस ना विचारून तू मलाच सारे?
तुझे नेमके मला गाळणे नवीन नाही
पुढे वाढवू कशी सांग मी उगाच नाती
स्वतःशीच हे पुन्हा मोडणे नवीन नाही
किती पाहतो निसर्गास मी उदासवाणा!
फुलांनी बळे बळे लाजणे नवीन नाही
तुझ्यावाटचे हरेनात का कुणी बिचारे
मना सज्जना,पुढे चालणे नवीन नाही
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा