अशी वेळ आणू नको

गौतमी - ⏱ १ मिनिट

मी जिंकताना तुला हारवावे अशी वेळ आणू नको
मी जिंकल्याचे तुला ना कळावे अशी वेळ आणू नको

आता कुठे होत आहे सुरू रात, बेहोष व्हावेस तू
ओल्या पहाटे तुला भान यावे अशी वेळ आणू नको

लाजून थोडी जरा दूर होता तुला आवरेनास तू
त्याच्यापुढे मी तुला लाजवावे अशी वेळ आणू नको

रोमात गंधीत आव्हान पाहून वाहून जाशील तू
तालात माझ्या तुला नाचवावे अशी वेळ आणू नको

जाणीव नाही कुणाला कशाची तिथे मी तुला नेतसे
माझे तुझे वेगळे जाणवावे अशी वेळ आणू नको

 

 

गझल