कळले जमीन नांगरायला पुन्हा हवी...
हृदयांत वेदना उगायला पुन्हा हवी
होती सुखात थंड भावना, अता कळे...
दु:खे अजून पांघरायला पुन्हा हवी
बोटे धरून चालती लहानगी मुले...
पण प्रेयसी तशी सुटायला पुन्हा हवी
शस्त्रें मनास छेदुनी अभंग गायली...
ओवी तशीच आळवायला पुन्हा हवी
जपली जुन्या-नवीन खेळण्यांत भावना...
ती माणसांत आज यायला पुन्हा हवी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा