कोठून ही पहाटे अलवार साद आली
कोमेजल्या कळ्यांची अलगद फुले ग झाली
छेडून शब्द गेले ,जाणीव पाकळ्यांना
तरळून श्वास गेले,स्वप्ने दवात न्हाली
सुख थांब सांगताही ना थांबले ग दारी
घेऊन त्यास संगे ,आशा पहा निघाली
ऋतु संपले तनाचे कळले मलाच नाही
पण सांज सावल्यांना माझी व्यथा न भ्याली
शिवलेत ओठ माझे यंदाच या युगाने
जगता, तरी कथा ती गझलेत या निमाली
आला वसंत कैसा, शिशिरात या मनाच्या
सुखवाट आज जेव्हा, क्षितिजाकडे निघाली
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा