निकाल लागला कधीच या जगायचा
उगाच प्रश्न ऐच्छिकातला लिहायचा
पुन्हा नवी पहाट दाखवे नवा जिना
पुन्हा सवाल हाच की कसा चढायचा
न फायदा तरी न मोह सोडला कधी
जसे म्हणायचीस तू तसे करायचा
तुझाच भोंडला तुझाच आव सारखा
खिरापतीस आमच्या न ओळखायचा
वराकडील मानपान मीच पाहतो
असाच भेटलाय तो मला पहायचा
सतर्क जीवनास पाहिजे करायला
नसायचो, उगाच पाळणा हलायचा
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा