तिथे ना फायदा काही कधी बोलून तत्वाचे
जिथे की कोण आहे बोलणारे हे महत्वाचे
चला बाहेर काढा शेपटी, मी चाललो आहे
गिळा बूटी जडी, पिटवा नगारे पौरुषत्वाचे
चरा निर्धास्त आता हंबरा शिमगा करा पोळा
गवत तुमच्याचसाठी पेरले भरपूर सत्वाचे
जरासा आसरा शोधून ठेवा हालण्याआधी
नसे ज्याच्यात मी ते विश्व होते बिनगुरुत्वाचे
गझल अंतीम भूषणची ममत्वानेच ओथंबे
तिच्यामधे कशाला शब्द हे यावे कटुत्वाचे?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा