कुठेच आता सवाल नाही

संतोष बडगुजर - ⏱ १ मिनिट

कुठेच आता सवाल नाही
कुठेच आता बवाल नाही

कशास पळता आता वळुनी
हातात माझ्या मशाल नाही

मला समजले फकीर त्यांनी
असो भिकारी, मवाळ नाही

तुझ्या घराशी मरेन म्हणतो
दुजा बहाणा जहाल नाही

तुझ्या सुरांशी कधीच नव्हतो
उगाच गाणे रटाळ नाही

उगाच भिंती खचुन गेल्या
असा कुठेही महाल नाही

मनात गातो तुझ्या कविता
उगीच कोठे, खुशाल नाही

संतोष (कवितेतला)

गझल