=====================
अजून दु:ख वेगळे असेल काय यापुढे?
जगायचे मला अता तुझ्याशिवाय यापुढे..
अनोळखी छटा तुझ्या मुखावरील सांगते,
'अनोळखी' म्हणून मी तुला हवाय यापुढे
नको पडायला अता नवीन प्रश्न आणखी;
नको सुचायला मला नवे उपाय यापुढे
किती पवित्र दोर हा तिच्या गळ्यात बांधला..
तिचा न उंबर्यातुनी निघेल पाय यापुढे !
दगावला असेलही मधाळ बंध आपला,
जगायला हवा निदान अंतराय यापुढे...
-ज्ञानेश.
=====================
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा