ही वाट तुझ्या स्वप्नांची आशेने तुडवित गेले
अन रंग तुझ्या प्रीतीचे अंगावर उडवित गेले.
त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले.
वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवित गेले.
जे जाणवले तुज नाही ते शब्द कोरडे झाले
दु:खाच्या भरल्या डोही मी मलाच बुडवित गेले.
जे नव्ह्ते माझ्यासाठी ते माझे म्हणूनी जपले
जेव्हा मज कळले तेव्हा शब्दांना अडवित गेले.
नीता आम्बेगावकर

गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा