ती संपली कहाणी

जयन्ता५२ - ⏱ १ मिनिट



ती संपली कहाणी
नाही कुठे निशाणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!


(जयन्ता५२)

गझल