आताशा तो जरा निराळे वागत असतो

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट
आताशा तो जरा निराळे वागत असतो

आताशा तो जरा निराळे वागत असतो
वारच नाही, शब्दांनाही पाळत असतो

त्याचीच करा चर्चा,  सांगा  त्याचे किस्से
तसाही तोच माझ्या मनात नांदत असतो

अनेकवेळा तीच कहाणी सांगत असतो
लकब आणि आवाज जरासा बदलत असतो

गळून पडती पिकली पाने जमिनीवरती
हा तुझा चेहराही का तसा दिसत असतो?

या लोकांची सवयच अंदाज बांधण्याची
  उगीच नाही तुझे नाव मी टाळत असतो

जुन्या गोष्टी बघून काय जास्त मिळणार आहे?
सेकंडहँड गाडीचा भाव पडत असतो..
गझल