इथे मी लाख सांगावे, कुणी ते का स्विकारावे ?
'कुणी ज्ञानासवे जावे, कुणी माझ्यासवे यावे'
नकारा झेलण्या तुझिया कधीचा मी तयाराहे
तिथे तू पोचली नाहीस तर मी काय मागावे ?
सदाचा घोळ हा माझा तिच्या प्रीतीत गुरफटला
असे मी काय केले की तिने गुंतेच सोडावे ?
मनाचा थांग माझ्या मी मनाने शोधतो आहे
तसा तो शोधण्या तू मन उधारीने तुझे द्यावे
पराचा होतसे कोणी, म्हणे कोकीळ मी आहे -
मिळे पिंडासवे भोजन, अता मयतासही गावे
अशी मी काय जादू साधली... निर्णय तिने द्यावा -
रहावी मूर्खता याची.. परी याला झुगारावे ?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा