मला नेमके भेटती जे नको ते -
फुलांनी करावा कशाला खुलासा..
जरी चोरला गंध त्यांचा जरासा
मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता मिळेना हवासा..
कधी भेट होईल माझी नभाशी?
धरेला मिळू दे सरीचा दिलासा...
मला पाहिजे ते उमगले तरीही
तुझ्यासारखा हा उलटतोच फासा
किती टाळले मी तरीही अडकतो
तुझी आठवण आणि ठसका जरासा...
मला टाळते ती नकोसा म्हणून
(तिला सोडुनी दूर जातो हवासा...)
कशाला धरावे तरी वैर त्याने?
समुद्रापुढे मीन आहे अमासा
-सोनाली जोशी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा