जाणीव वेदनांची ही सारखी कशाला ?
माझ्याच वैभवाला मी पारखी कशाला ?
माझे नसून राही माझ्याच अंतरी जे,
ते सौख्य साद घाली मज सारखी कशाला ?
गीतांत रंगले जे, चित्तात कोरले जे,
ते नाव आज येई माझ्या मुखी कशाला ?
त्या शांत सागराला वेढून वादळांनी
अस्वस्थ मी, तयाची झाले सखी कशाला ?
माझे मला कळेना, अविचार काय केला
का दु:ख टाळले मी ? झाले सुखी कशाला ?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा