माझी ही गझल माझ्या "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधली आहे. अभिजीत राणे ह्यांचं संगीत दिग्दर्शन आणि स्वप्निल बांदोडकरांचा आवाज. ही गझल इथे ऐकता येईल.
http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe
आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे
तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे
ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे
स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे
संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्यात आहे
ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे
जयश्री अंबासकर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा