वेगासवे मनाच्या, मी धावणार आहे

प्रज्ञा महाजन - ⏱ १ मिनिट


वेगासवे  मनाच्या,  मी  धावणार  आहे
थोडे  करून  हेही,  मी  पाहणार  आहे.

हा  सूर  ताल  झाला,  या  अंगणात  माझ्या
ते  वाकडे  असेना,  मी  नाचणार  आहे.

ना  आस  आसवांची,  आता  मला  हवीशी
गंगाच  आटली  ती,  ना  वाहणार  आहे.

वांध्यात  जीव  थोडा,  जो  सैरभैर  झाला
श्वासात  घेत  त्याला,  मी  बाहणार  आहे.

तो  ध्रूव  आणि  तारे,  तेथे  असोत  सारे
जागा  अशीच  माझी,  ही  राहणार  आहे.

                               प्रज्ञा महाजन


गझल